पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज रहा…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे सर्व विभागांना आवाहन

⚡कणकवली ता.१५-: पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास तातडीने तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. तसेच सर्व अत्यावश्यक विभाग व यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. पुरस्थिती, घाटरस्त्यावर दरडी कोसळणे अशा समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाला कळविण्यासोबतच जबाबदारी दिलेल्या विभागांनी उपायोजनाही सुरू कराव्यात. या कालावधीत सर्व विभाग व यंत्रणांनी अलर्ट रहावे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती के. के. प्रभू, लघु पाटबंधारेचे उपविभागीय अभियंता मंगेश माणगांवकर, संतोष शिरोडकर, महेश हिरेगोंडर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अतुल शिवणीवार, महावितरणचे उपविभागीय अभियंता विलास बगडे, आगार व्यवस्थापक आ. द. गायकवाड तसेच इतर विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page