कणकवली : शहरातील वरचीवाडी येथील समर्थनगर परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
समर्थनगर परिसरात संजय गणेश हर्णे यांची विहीर आहे. या परिसरात हर्णे यांचे बुधवारी सकाळी कामगार काम करण्यासाठी गेले असता विहिरीत त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. कामगारांनी या घटनेची माहिती हर्णे यांना दिली. त्यानंतर हर्णे यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत तरंगत असलेला सदर व्यक्तीचा मृतदेह कामगारांनी बाहेर काढला. याबाबत संजय हर्णे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सदर मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नसून मृत व्यक्तीच्या पायात काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व अंगात लाल रंगाचा शर्ट आहे. याबाबत तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
समर्थनगर परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह..
