इन्सुली डोबाशेळ येथील दुचाकी चोरली…

अज्ञात चोरट्या विरोधात बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

⚡बांदा ता.१५-: इन्सुली डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांची घराशेजारी लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री चोरली. याबाबत त्यांनी बांदा पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांनी आपल्या मालकीची ड्रीम युगा दुचाकी आपल्या घराशेजारी लावली होती. दरम्यान सकाळी उठून पाहिली असता ती लावलेल्या ठिकाणी नसल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी बांदा पोलीसात तक्रार दिली असून सुमारे 40 हजार किमतीची दुचाकी चोरून नेण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहे.

You cannot copy content of this page