परजिल्ह्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू…

⚡कणकवली ता.१३-: मूळ गोंदिया व सध्या शहरातील बिजलीनगर येथे वास्तव्यास असलेल्या मुरली नत्थू दुधपाच (37) या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मुरली रविवारी रात्री 9 वा. सुमारास येथील शिवाजी महाराज चोकातून मराठा मंडळ हॉलकडे जाणार्‍या रस्त्यानजीक पडलेल्या स्थितीत होता. शरीराची हालचाल होत नसल्याने नागरिकांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता. मुरली याचा मृत्यू दारूच्या अती सेवनामुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुरली विहिर खोदाईचे काम करायचा. सहकारी कामगारांसमवेत तो बिजलीनगर येथे राहत होता. सहकारी कामगार दादू मिताराम नेवारे (37, गोंदिया) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page