⚡कणकवली ता.१३-: शिवडाव धरणाचे सोडलेले पाणी 12 दिवसांनी, सोमवारी कणकवलीतील गडनदी पात्रात दाखल झाले. नदीपात्र कोरडे पडल्याने शनिवारी कणकवली शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. मात्र, धरणाचे पाणी पोहोचल्याने कणकवलीकरांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कणकवलीला पाणीपुरवठा करणार्या गडनदी पात्रातील करकीााी कोंड येथील पाणीसाठा आटल्याने नगरपंचायतीतर्फे जवळपास 20 दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून शिवडाव धरणााो पाणी गडनदी पात्रात सोडण्याााी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 1 मे रोजी सायंकाळच्या सुमारास हे पाणी गडनदी पात्रात सोडण्यात आले होते. तब्बल 12 दिवसांनी धरणाचे पाणी गडनदी पात्रात दाखल झाले.
शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल…
