शिरवलमधील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता…

कणकवली : शिरवल-टेंबवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह मंगळवार 14 मे रोजी सांगता होणार आहे. पारायण व हरिनामामुळे टेंबवाडी परिसरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात भक्तमंडळी विठ्ठल नामाचा गजर करीत आहेत.


ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार 7 मे रोजी ह.भ.प. काशिनाथ फोकमारे महाराज यांच्या हस्ते झाले होते. यावेळी वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्त गेले 7 दिवस दररोज पहाटे काकड आरती, श्रींची महापूजा, ग्रंथवाचन, हरिपाठ, कीर्तन हे कार्यक्रम पार पडले. दुपारी व रात्रीच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. गजर माऊलीचा, उत्सव कीर्तनाचा या कार्यक्रमात नामवंत कीर्तनकारांनी कीर्तने सादर केली. मंदिरातील श्री विठ्ठल रुखमाई मूर्ती व गाभाऱ्यातील आरास लक्षवेधी ठरत आहे.

You cannot copy content of this page