सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा सवाल
*💫मालवण दि.२७-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती सोबत घेउन शाळांमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन लस कधी देणार असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, जिल्हा संघटक अजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजुच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापुर जिल्ह्यात लसिकरणाचा दुसरा डोस देणे सुरु झालेले असताना महाराष्ट्रात शिक्षणामध्ये कायम अव्वल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लसिकरणामध्ये सापल्नकभावाची वागणुक का? आठ दिवसांपूर्वी देवगड येथील एका शिक्षकाचा कोविडमुळे पहीला बळी गेला. अजुन बळी जायच्या अगोदर लसिकरण कार्यक्रम नियोजन करून शिक्षण क्षेत्राला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाभरातुन जोर धरू लागली आहे. लॉकडाऊन काळामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निरनिराळ्या आघाड्यांवर कोविडयोद्धा म्हणुन सेवा बजावली आहे. शिक्षकांना दररोज शेकडो विद्यार्थ्यांसमोर जाव लागते. शिक्षक सुरक्षित तर विद्यार्थी सुरक्षित, त्यामुळे लवकरात लवकर लसिकरण कार्यक्रम राबवुन शिक्षणक्षेत्राला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सचिव पांडुरंग काळे, कोकण विभाग लोकशाही आघाडी अध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा माजी सचिव उमेश सुकी, जिल्हा उपाध्यक्ष माधव यादव, विजय मयेकर, संदीप शिंदे, प्रकाश कानुरकर, शिवराम जाधव, नारायण माने, संभाजी कोरे, रंजन तेली, दशरथ काळे, प्रशांत चव्हाण, अशोक गिते, मारुती माने, सुजित गंगावणे, संजय परब, अंकुश मिरकर, अजय सावंत, उमेश सावंत, प्रविण खडपकर, अच्युत वनवे, मारुती पुजारी, सुदीन पेडणेकर, जयकुमार पाटील, जयदीप सुतार, विठ्ठल सावंत, संजय शेवाळे, अश्विनी गर्जे, ज्योती वाडकर, तेजस्विनी पाटील, श्रृती बालम, पंडित माने, गणपत नरे, ए. ए. मोहीते, एस. एम, नौकुडकर, एस. एम. पवार, जी. ए. कदम, आय. पी. केंद्रे, व्ही. एस. सातपुते, बी. जे. पावरा, एस. एस. जाधव, बी. आर. कोकरे, एन. आर. पाटील आर एन. ठाकुर, एस. बी. तुबंडा, ए. टी. बहीराम, के. बी. पाडवी आदी होते.
