मच्छिमार महिलांनी पतसंस्थेसाठी पुढाकार घ्यावा…

आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली इच्छा ;स्वतः पहिले भागभांडवल एक लाख रुपये देण्याचेही केले जाहीर

मालवण दि प्रतिनिधी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मालवण तालुक्यात धुमधडाक्यात साजरा होत असताना या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमार महिलांनी पुढाकार घेऊन पतसंस्था निर्माण केल्यास त्या पतसंस्थेसाठी पहिले भागभांडवल म्हणून १ लाख रुपये आपण जाहीर करीत असल्याचे आम नाईक यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी शिवसेना शाखेनजीक आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मत्स्य विक्रेत्या महिलांची मोठी उपस्थिती होती. यावेळी या महिलांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आमदार नाईक म्हणाले , आपल्या राजकिय जडणघडणीत पारंपरिक मच्छिमारांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळेच पारंपरिक मच्छिमारांच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून मत्स्य विक्रेत्या महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या आर्थिक विकासासाठी पतसंस्था उभारण्याचे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. या महिलांनी पुढाकार घेऊन अशी पतसंस्था उभारल्यास त्या पतसंस्थेसाठी पहिले भागभांडवल म्हणून १ लाख रुपये आपण जाहीर करीत असल्याचे सांगून आ. नाईक यांनी मत्स्य विक्रेत्या महिलांच्या उपस्थितीबाबत आभार मानताना या महिलांनी पतसंस्था उभारून आर्थिक सक्षम होण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page