संजय गांधी निराधार योजनेची १०९ प्रकरणे मंजूर…

समिती अध्यक्ष मंदार केणी; आ नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य

*💫मालवण दि.२७-:* मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत विविध १०९ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही भेट दिल्याची प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष तथा नगरपालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली. मालवण तहसिल कार्यालयात पार पडलेल्या सभेस तहसीलदार अजय पाटणे, नायब तहसीलदार कोकरे, अव्वल कारकून मोंडकर, समिती सदस्य गणेश कुडाळकर, भाऊ चव्हाण, सुनील पाताडे, अनुष्का गावकर, प्रदीप मांजरेकर, प्रमोद कांडरकर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ६१, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची २, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट अ) ची २, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (गट ब) ची ४६ अशी एकूण १०९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

You cannot copy content of this page