१५ एप्रिल पर्यंत कोरोना टेस्ट करून घ्या…

मालवण मुख्याधिकारी जिरगे यांचे आवाहन;अल्पबचत सभागृहात आरटीपीसीआर टेस्टची सुविधा

*💫मालवण दि.२७-:* राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने कोरोना विषयक निर्गमित केलेल्या आदेशानुसार मालवण शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक, हातीगाडी फळ विक्रेते, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक यांनी स्वत: व त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांनी दिनांक १५ एप्रिल २०२१ पर्यंत अल्पबचत हॉल, मालवण नगरपरिषद येथील कोव्हीड-१९ स्वॅब तपासणी केंद्रामध्ये सकाळी १० ते ०१ तसेच दुपारी ३ ते ४ या कालावधीत कोरोना आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी अशा सूचना मालवण नागरपालिकेतर्फे मुख्याधिकारी तथा इंसिडन्ट कमांडर संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंध कायदा, १८९७, दिनांक १३ मार्च पासून लागू करुन खंड २, ३ , ४ मधील तरतुदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी जिल्हयात कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत आदेश निगमित केलेले आहेत. त्यानुसार मालवण शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक, हातीगाडी फळ विक्रेते, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक यांनी स्वत: व त्यांचे आस्थापनामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांनी दि. १५ एप्रिल पर्यंत अल्पबचत हॉल, मालवण नगरपरिषद येथील कोव्हीड-१९ स्वॅब तपासणी केंद्रामध्ये कोरोना आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावयाची आहे. तसेच कोव्हीड-१९ चा प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जे व्यवसायिक दि.१५ एप्रिल अखेर पर्यंत आरटीपीसीआर तपासणी करुन अहवाल प्राप्त करुन न घेतल्याचे आढळून आल्यास अशा आस्थापना/ दुकान शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात येईल, असेही मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page