सिंधुभुमी पर्यटन केंद्राअंतर्गत ३३ महिला उद्योजकाना मार्गदर्शन…

व्होकल फ़ॉर लोकल अंतर्गत आयोजन;प्रमोद जठार यांची उपस्थिती

*💫कणकवली दि.२७-:* कोकण विभाग महिला संचलित व्होकल फॉर लोकल या स्कीम अंतर्गत सिंधुभूमी पर्यटक सेवा केंद्राच्या माध्यमातून 33 महिला उद्योजक मार्गदर्शन मेळावा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथील सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट च्या कार्यलयात संपन्न झाला. सदर कार्यक्रमा मध्ये उपस्थित उद्योजकांना व्यवसाया बद्धल मार्केटिंग व सिंधुभूमी पर्यटक सेवा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्व सेवा सुविधा या सर्व विषयी माजी आमदार प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. तसेच बँकेतील कर्ज प्रकरण मंजुरी विषयी सारस्वत बँक शाखा कणकवली चे व्यवस्थापक श्री फणसळकर यांनी मार्गदर्शन केले. कणकवली नगरपंचायत बांधकाम सभापती सौ मेघा गांगण यांनी उपस्थितांचे आभार मानले

You cannot copy content of this page