विविध उपक्रम:सामाजिक संस्था, हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव
मालवण दि प्रतिनिधी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकां बरोबरच आमदार नाईक प्रेमींनी आणि हितचिंतकांनी साजरा करतानाच सायंकाळी झालेल्या आमदार वैभव नाईक सत्कार सोहळ्यात शिवसेने बरोबरच मालवण वासीयांनी आपल्या लाडक्या आमदारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवण तालुक्यात मच्छिमार महिलांचा तसेच अपंगांना दुचाकीचे वाटप करण्यात आले तसेच शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी रुग्णांना फळ वाटप आणि इतर उपक्रम राबविण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला होडी प्रवासी वाहतूक संघटनेने अनावच्या सविता आश्रमला धान्य वाटप करण्यात आले यावेळ मंगेश सावंत, स्वप्नील आचरेकर,काका जोशी, राजु पराडकर, संजय नार्वेकर, बाबा जोगी, महेन्द्र म्हाडगुत व इतर उपस्थित होते. मालवण येथे आज सायंकाळी शिवसेना मालवण शाखेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवसानिमित्त आमदार नाईक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर साईनाथ चव्हाण,भाई गोवेकर, संदेश पारकर, मनीषा जाधव, मंदार केणी, बाबा सावंत, पंकज वर्दम, अमित भोगले, यतीन खोत, अवधूत मालंडकर, सौ पूनम चव्हाण, महेश कांदळगांवकर,हरी खोबरेकर, पंकज सादये, सुशांत नाईक, आशिष पेडणेकर, गुरुनाथ खोत, सुभाष मयेकर, पूजा तोंडवळकर, दीपा शिंदे, सेजल परब, तृप्ती मयेकर, नीलम शिंदे, गणेश कुडाळकर तसेच आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आ. नाईक यांनी वाढदिवसाचा केक कापला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार वैभव नाईक म्हणाले, दहा वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवून जिल्हाप्रमुख म्हणून पद दिले. आज सर्वांनी मला स्वीकारले आहे. मच्छिमार बांधव उपोषणाला बसलेत तर त्या पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी आपण खंबीर उभे आहोत. परंतु आज वाढदिवसाच्या निमित्ताने मच्छीमारांनी उपोषण मागे घेण्याचे मी आवाहन करतो. मच्छीमारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम आमचे आहे आणि सरकार मच्छीमारांच्या पाठिशी आहे. जिल्ह्यामध्ये मच्छिमारांना तसेच मच्छिमार महिलांना स्वतंत्र पॅकेज मिळाले नव्हते. परंतु प्रत्येकी दोन हजार महिलांना ६ हजार चे पॅकेज देण्याचे काम केले आहे. गेली सात आठ वर्षे याठिकाणी आमदार म्हणून काम करताना या विभागातील प्रश्न सोडविण्याचे काम चालू आहे. मालवण ते कसाल हा रस्ता पूर्ण केला तसेच येत्या दिवाळीपर्यंत सर्व रस्त्याचे काम पूर्ण होईल असे नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस साजरा केल्यामुळे माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेगाने धावत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने धावण्याचा आणि काम करण्याचा विश्वास मी जनतेला देतो. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असून येणारी पाच वर्ष आपली कामगिरी चांगल्याप्रकारे सांभाळणार आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत भगवा फडकविण्याचे काम शिवसैनिकांनी करायचे आहे, असेही यावेळी आम. नाईक म्हणाले. यावेळी गुरुनाथ खोत, संदेश पारकर मंदार केणी, साईनाथ चव्हाण, भाई गोवेकर, आशिष पेडणेकर, सुभाष पेडणेकर, हरी खोबरेकर, पूनम चव्हाण आदींची शुभेच्छा दर्शक भाषणे झाली.
