होळी सणा निमित्त करून चेक पोस्ट येथे प्रवाशी तपासणी सुरू…

*💫वैभववाडी दि.२६-:* होळी सणानिमित्त कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणे मार्फत परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी आरोग्य विभागा मार्फत करूळ चेक पोस्ट येथे सुरू करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 26 मार्च ते 31 मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. थर्मल गण व ऑक्सिमीटरच्या मार्फत पर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या प्रवाशांमध्ये जास्त ताप असेल तर त्याची माहिती घेऊन त्याला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येते तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे .तपासणी मोहिमेमध्ये पोलीस, विभाग आरोग्य विभाग ,महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहीम सुरू आहे. अशी माहिती आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी दिली.

You cannot copy content of this page