स्थानिक गुन्हा अन्वेषणची धडक
*💫सावंतवाडी दि.२६-:* कवठणी येथे गावठी काजूच्या दारूची हातभट्टी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग ने उध्वस्त करत मोठा दारू साठा जप्त केला आहे. ही कारवाई आज सकाळी ९ च्या सुमारास करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आज कवठणी येथे जंगलमय डोंगराळ भागात सुरू असलेल्या काजू फेणी दारूच्या हतभ्ट्टीवर कारवाई केली आहे. या कारवाईत ७०० लिटर काजूचे बोंडू मिश्रित रसायन एकूण किंमत ७० हजार रुपये , गावठी काजू फेणी दारू २८० लिटर ५६ हजार रुपये, व इतर हात भट्टी चे साहित्य ४ हजार रुपये असे एकूण १ लाख ३० हजार किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
