मुख्यमंत्री होण्यापूर्वी किती वेळा उद्धव ठाकरे हे चैन्यभूमीवर गेले… ?

आमदार नीतेश राणे यांचा सवाल: पत्राचाळ घोटाळ्यामुळे मराठी माणसे बेघर झाली..

⚡कणकवली ता.३०-: उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेल्या एक फोटो संजय राऊत यांनी अाम्हाला दाखवावा, असे आव्हान आमदार नीतेश राणे दिले आहे. उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय हे चैन्यभूमीवर जाऊन अभिवादन करताना दिसले नाही. याची कारणे राऊतांनी त्यांना विचारावीत. ठाकरे व त्यांचे कुटुंबीयांचे डाॅ. आंबेडकर यांच्याबाबत काय विचार अाहेत, याबाबत राऊतांनी ठाकरेंना विचारणा करावी, अन्यथा अाम्हाला पुरावे उघड करावे लागतील, असा इशारा राणेंना दिला. डाॅ. आंबेडकर यांच्या सन्मानाबद्दल भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राऊतांनी शिकवू नये. डाॅ. अांबेडकर हे कोण होते, हे राऊतांनी उद्धव ठाकरे यांना सांगावे. डाॅ. आंबेडकरांनी संविधान कसे घडविले याचे लेक्चर राऊतांनी उद्धव ठाकरे यांना द्यावे अाणि त्यांनी सकाळचे मनोरंजन करावे, असे प्रत्युतर राणेंनी दिले.
105 हुताम्यांचे अात्मे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मान्य करणार नाही, असे संजय राऊत सांगत अाहेत. मात्र, पत्राचाळ घोटळ्यामुळे मराठी माणसे बेघर झाली अाहेत. ही माणसे राऊतांना माफ करणार अाहेत का याचा विचार त्यांनी करावा. त्यामुळे राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करणे टाळावे, असा इशारा राणेंना दिला.

You cannot copy content of this page