इळयेतील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

⚡देवगड ता.३०-: देवगड तालुक्यातील इळये-बौद्धवाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांच्या हातात शिवबंधन राऊत यांनी बांधून पक्षात स्वागत केले.


उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी सेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, गौरीशंकर खोत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page