तहसीलदारांना निवेदन देवून भारत बंद आंदोलन उपोषण मागे…

तालुकाध्यक्ष सांगेलकर यानी दिले तहसीदारांना निवेदन

सावंतवाडी-: केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला असून, या बंदला कॉंग्रेस ने जाहीर पाठिंबा देत उपोषण पुकारले होते. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला साथ देण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार याना कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी निवेदन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, माजी नगरसेवक राजू मसुरकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, बाबल्या म्हापसेकर, संदेश सुकी, मधुकर शिंदे, विल्मन सालधाना, विभावरी सुकी, अनवर खान आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page