काळे आजींच्या शिशुविहार बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…

⚡मालवण ता.२६-:
मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडी मधील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. हि मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश करणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

टोपीवाला हायस्कुलच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. वळंजू, बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे, मुख्यशिक्षिका सौ. संस्कृती बांदकर, शिक्षिका निशा बिडये, सौ. शर्वरी घाडी, सौ. प्रज्ञा राणे, सौ. शालन सावंत यांसह पालक उपस्थित होते. बालवाडीचे ज्येष्ठ पालक श्री. केणी यांनी मुख्याध्यापक श्री. वळंजू यांचे स्वागत केले.

यावेळी श्री. वळंजू यांनी विद्यार्थी बालवाडीमधून टोपीवाला शाळेच्या परिवारात सहभागी होत असल्याबाबत आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यशिक्षिका सौ. संस्कृती बांदकर यांनी मुलांचे संगोपन, संस्कार तसेच हि मुले पहिलीत जाणार असल्याने घ्यावयाची काळजी, त्यांचा अभ्यास याविषयी पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्रीधर काळे यांनीही मार्गदर्शन करत पालकांनी इयत्ता पहिलीपासून एकोप्याने मुलांची प्रगती होत असताना लक्ष द्यावे असे सांगितले. सौ. मालती काळे यांनीही विचार मांडत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांना बालवाडीचे प्रमाणपत्र, भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले. तर विद्यार्थ्यांतर्फे पालकांनीही बालवाडीला भेटवस्तू प्रदान केल्या.

You cannot copy content of this page