नीतेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका..
कणकवली ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरानाम्याची माहिती पत्रकारांना देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीरनामाचा कागद पडला. ज्यांना जाहीरनामा निट पकडता येत नाही, ते खासदार काय निवडून आणणार, अशी बोचरी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर झाली नाही, तर ठाकरेंचे दोन पुत्र व संजय राऊत यांच्या दोन मुलींची बेरोजगारी दूर झाली, अशी टीका राणेंनी केली. शिवसेनेच्या वचनमान्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे, या फोटोवरून उबाठा महिला सक्षमीकरणाची भाषा कशी काय करू शकते, असा सवाल राणेंना केला. संजय राऊत यांच्यावर दिशा सालियानच्या खुनाचा, डाॅक्टर महिलेला छळ केल्याच्या आरोप आहे, त्या लोकांच्या जाहीरनाम्यात महिला सक्षमीकरणाचा मुद्दा असेल तर त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. उद्धव ठाकरेंना जाहीरनामा पडकता येत नाहीत, ते देशाचे नेतृत्व करू पाहत, हा मोठा जोक असल्याची टीप्पणी राणेंनी केली. उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिरांजली दिली आणि काॅंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही, असा दावा राणेंनी केला
