जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत योजना जनतेपर्यंत पोहोचणार; राणे कुटुंबियांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही..
*💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा पुनश्च मान मला राणे कुटुंबियांनी दिला आहे. त्यामुळे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, व आमदार नितेश राणे यांचे ऋण व्यक्त करते. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी काम करणार असल्याच्या असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत दिली. तुझीच राणी कुटुंबियांनी टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कणकवली पंचायत समिती भेट दिली त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष गोटा सावंत व पंचायत समिती गटविकास अधिकारी ,भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
