… तर गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही

सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचा इशारा : गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही

*💫बांदा दि.२६-:* गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी राहू असा निर्णय श्री साई समर्थ डंपर व ट्रक चालक मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. गोवा हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरवर आरटीओ आणि महसूल विभागाकडून कारवाई होत असल्याने गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही असा इशारा सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर धुरी यांनी सांगितले की, गोव्यातील डंपर व्यावसायिकांनी इतर कुठल्याही संघटनेच्या अफवांना भयभीत न होता डीबीएल तसेच एअरपोर्ट वाहतुकीसाठी डंपर नेऊ शकता. कोणताही त्रास दिल्यास आम्ही संघटनेच्या वतीने आपल्या पाठीशी पूर्णपणे उभे राहू. यावेळी प्रशांत पांगम, मिलिंद नाईक, तौसिफ शेख, गुणाजी गावडे, जितू गावकर आदींसह डंपर चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page