देवगड गढीताम्हाणे वरचीवाडीतील घटना;प्रकृती गंभीर:देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
देवगड : घरगुती भांडणातून सख्ख्या भावाने भावाच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गढीताम्हाणे वरचीवाडी येथे गुरूवारी दुपारी २.१५ वा. सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, गढीताम्हाणे वरचीवाडी येथे झालेल्या घरगुती वादातून त्यांचाच सख्ख्या भावानेच भावाच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने देवगड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पडवे येथे नेण्यात आले. याबाबत त्यांच्या पत्नीने देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
