पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलन १४ व्या दिवशीही दुर्लक्षित

मत्स्य अधिकाऱ्यांची पाठ मश्चिमारांत तीव्र नाराजी

*💫मालवण दि.२५-:* एलईडी पर्ससीन मासेमारीवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या १४ व्या दिवशीही मत्स्य अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी उद्यापासून ‘घंटानाद आंदोलन’ छेडण्याचा इशारा दिला. मात्र सध्या जमावबंदी आदेश लागू असल्याने मच्छीमारांना हे आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान उपोषणकर्त्या मच्छीमारांनी उपोषणस्थळीच मच्छीमारी जाळी विणण्यास सुरुवात केली. मच्छीमारांनी गेले चौदा दिवस आंदोलन सुरू असताना मत्स्यव्यवसाय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने संतप्त मच्छीमारांनी आज मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एलईडी तसेच अनधिकृत पर्ससीनच्या मासेमारीवर कारवाई व्हावी यासह अन्य मागण्यांसंदर्भात स्थानिक पारंपारिक मच्छीमारांनी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी उपोषणकर्त्यांची भेट घेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे. यात मत्स्यव्यवसाय विभागाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आलेल्या पत्रावर मच्छीमार समाधानी नसून त्यांनी जोपर्यंत शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मच्छीमारांनी केला आहे., गेले चौदा दिवस हे साखळी उपोषण शांततेत सुरू आहे. मात्र मत्स्यव्यवसाय खात्याने या उपोषणाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट करत या विरोधात उद्यापासून घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. मात्र सध्या जमावबंदी असल्याने तुम्हाला हे आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. उपोषणस्थळी मच्छीमारांनी विणल्या जाळ्या पारंपारिक मच्छीमारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. गेले चौदा दिवस हे उपोषण सुरू आहे. मात्र अद्यापही मच्छीमारांना न्याय मिळालेला नाही. उपोषणामुळे व्यवसाय बंद असल्याने उपोषणाला बसलेल्या मच्छीमारांनी उपोषणस्थळीच मासेमारी जाळ्या विणण्याच्या कामास सुरवात केली आहे. फोटो- मालवणात उपोषणकर्त्या पारंपारिक मच्छीमारांनी उपोषणस्थळीच जाळ्या विणण्याच्या कामास सुरवात केली.

You cannot copy content of this page