तोरसोळे फाट्यावर झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यु…

पाच वर्षाची मुलगी गंभीर जखमी एक्टीव्हा आणि ट्रकमध्ये झाला अपघाता

*💫देवगड दि.२५-:* तोरसोळे फाट्यानजीक ॲक्टिवा आणि ट्रक झालेल्या अपघातात ॲक्टिवा चालक सौ. त्रिशा‌ तुषार सावंत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची लहान मुलगी ओवी तुषार सावंत ( वय ५) ही गंभीर जख्मी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास धोपटेवाडी वळणावर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीला क्लास ला सोडायला जाताना शिरगाव हुन देवगडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शिरगावकडे जाणाऱ्या दुचाकी ला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकी चालक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिची लहान मुलगी गंभीर जख्मी झाली आहे. तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page