राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या गाडीला अपघात
बांदा : प्रतिनिधी गोव्या वरून बांद्याच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीने कट्टा कॉर्नर येथील ओवेस कॉम्प्लेक्स येथे उभ्या असलेल्या चारचकीला धडक दिल्याने अपघात घडला. सदर चारचाकी ही रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची होती. धडक दिलेला दुचाकीस्वार यामध्ये किरकोळ जखमी झाला मात्र चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर अपघात गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडला. जखमी झालेल्या युवकावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले. सदर अपघाताची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.
