एक गंभीर जखमी; उपजिल्हा रुग्णालयात दाखल..
*💫कणकवली दि.२५-:* कणकवली प्रांत कार्यालयासमोर एका दुचाकीला ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या दुचाकीची मागून धडक बसली. या भीषण अपघातात देवगड मोंड येथे जाणारा मोटरसायकल चालक सर्वेश नारायण अनुभवणे (वय-३०),हेमंत संजय मासये (वय-२१)हे दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ७.३० वाजता झाला. त्यानंतर कणकवली शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती, जखमींना उपचारासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. या ठिकाणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महेश सावंत,संदेश पटेल,नगरसेवक कन्हैया पारकर,रिमेश चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.
