कणकवली शहरात उबाठा गटाला धक्का
⚡कणकवली ता.२३-: शिवसेना उबाठा गटाच्या युवा सेनेचे कणकवली तालुका सरचिटणीस गौरव हर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ओम गणेश निवासस्थानी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
हर्णे यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरात उबाठा गटाला धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाच्यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप तळेकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते. हर्णे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे आमदार नीतेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.
