विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करणे थांबवावे…

संतोष शिंगाडे: १० वर्षांच्या कार्यकाळात कोणती विकासकामे केली याचा लेखाजोगा जनतेसमोर मांडा..

देवगड(प्रतिनिधी)

  मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे व्यक्तिगत टिका करत आहेत. हि टिका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. या टीकेला जशास तसे उत्तर देण्याची धमक मनसे मध्ये आहे. तुम्ही तुमच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात कोणती विकासकामे केली याचा लेखाजोगा जनतेसमोर मांडा व त्या कामांवर  मते मागा. कोण लवंगी फटाका व कोण मोठा धमाका करणारा नेता याची पुरेपूर जाण मतदारांना व संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्या मुळे उगाच या भानगडीत पडू नका  अन्यथा लवंगी फटाक्यांची माळ आजूबाजूस लावली तरी तुमची पळता भुई थोडी होईल असा इशारा मनसे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे  यांनी दिला आहे.       

 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचार कार्यात मनसेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत असून या बाबत  मनसेचे नेते अविनाश जाधव, शिरीष सावंत जिल्हा निरीक्षक संदीप दळवी व गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे संतोष शिंगाडे यांनी स्पष्ट केले.
You cannot copy content of this page