सावंतवाडी ता.२३-: श्री हनुमान मंदिर, माजगाव, खालची आळी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सन्मा.विशाल परब यांनी उपस्थित राहून देवदेवतांचे मनोभावे दर्शन घेत उपस्थितांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.
श्री हनुमान सर्वांना सुख समृद्धी दीर्घायुष्य देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. बजरंग बलीच्या दर्शनाने एक प्रकारची अध्यात्मिक ऊर्जा मिळाली. यावेळी केलेला सन्मानाचा स्वीकार करून कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले.यावेळी खालचीआळीकर सावंत भोसले समाजाच्या वतीने समाज प्रमुख दाजी सावंत, सरपंच सौ.अर्चना सावंत , माजी सरपंच संदिप सावंत, उमेश सावंत, यशवंत सावंत यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी अजय सावंत व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
