हेवेदावे बाजूला ठेऊन नारायण राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवण्यासाठी काम करा…

सचिन वालावलकर:दीपक केसरकर यांच्या प्रेमापोटी महायुतीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवा..

⚡वेंगुर्ले ता.२३-: आज महायुतीच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यामुळे गावागावात युतीतील पक्षातील पदाधिकारी यांच्यामध्ये असलेले हेवेदावे बाजूला ठेऊन नारायण राणे यांना केंद्रात मंत्री म्हणून पाठवण्यासाठी काम करा. दीपक केसरकर यांनी केलेली विकासकामे घराघरात पोचवा. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला त्यांच्यापर्यंय पोहोचा. दीपक केसरकर यांच्या प्रेमापोटी महायुतीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबवा असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी बैठकीत केले.

वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बूथप्रमुख यांची बैठक येथील सप्तसागर अपार्टमेंट मधील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील मोरजकर, कोस्टल भागातील तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, तालुका संघटक बाळा दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत म्हापण जिल्हा परिषद विभाग प्रमुख पदी दत्ता साळगावकर, उभादंडा जि प मतदार संघ विभाग प्रमुखपदी नयन पेडणेकर, उपविभाग प्रमुखपदी आसोली येथील संजय गावडे, आडेली जि प मतदार संघ प्रभारी विभाग प्रमुख पदी मितेश परब, रेडी जि प उपतालुका संघटकपदी सुनील सातजी यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

You cannot copy content of this page