⚡देवगड ता.२३-:
श्री १००८ भगवान पार्श्वनाथ आतिशय क्षेत्र खारेपाटण येथे भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात मंगल गीते, ध्वजारोहण, दोन्ही मंदिरांत पंचामृत अभिषेक, भगवान महावीर जन्मोत्सव सवाल ,पालखी मिरवणूक व भगवान महावीर अभिषेक आरती असे कार्यक्रम पार पडले.
या सोहळ्यात तीर्थंकर माता हा मान सौ धनश्री सचिन ब्रह्मदंडे तीर्थंकर आत्या कश्मीरा अभिषेक डोर्ले, सौ पल्लवी अभिजीत डोर्ले, पाळण्याच्या चार दोऱ्यांचा मान सौ ईश्वरी अक्षय ब्रम्हदंडे, सौ स्वप्नाली संतोष डोर्ले, कुमारी अमृता प्रफुल्ल ब्रह्ददंडे सौ अनुपमा शक्ती कुमार उपाध्ये काजळ घालणेहा मान सौ मनाली महावी होनाळे,सुंठवडा वाटप सौ सायली तुषार डोर्ले
कीर्तनकार माता ओटी भरणेहा मान सौ पुनम अमित आवटे यांना प्राप्त झाला या कार्यक्रमात पद्मावती महिला मंडळामार्फत संगीत आरती चा मान मिळाला म मिरवणूक नंतर भगवंत अभिषेक सायंकाळी इंद्र इंद्रायणी यजमान विनोद महावीर विनोद ब्रम्हदंडे यांना मिळाला . या सोहळ्याचे आहार दान श्रीमती कावळे,तुषार डोर्ले यांनी मिळविला हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजसेवा मंडळ खारेपाटण पद्मावती महिला मंडळ, खारेपाटण जैन सेवाक सारिका खारेपाटण यांनी विशेष मेहनत घेतली.
भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाचे औचित्य साधून आम.नितेश राणे भेट देऊन जैन बांधवांना भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.मंदिराचे उपाध्ये अजित पंडित यांनी त्यांना आशीर्वादपर श्रीफळ दिले.
अतिशय क्षेत्र खारेपाटण येथे भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न…
