ओझर विद्यामंदिरला दहा संगणक संच भेट…

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेला रोटरी क्लब मुलुंड साऊथ यांनी पाच आणि सदस्य मुकेश केनिया यांनी पाच संगणक संच भेट म्हणून दिले. त्यामुळे ओझर विद्यामंदिर आता संगणक सज्ज झाले आहे. सदर संगणक संच मिळवून देण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे सहकार्य लाभले.

शाळेला उपलब्ध झालेल्या संगणक संचामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना आता विविध अॅप्लिकेशन्सद्वारे संगणक ज्ञान मिळविणे सुलभ होणार आहे. तसेच विविध शैक्षणिक ॲप्लिकेशन्स आणि ऑनलाईन शैक्षणिक माहितीसुद्धा मिळविता येणार आहे. प्रशालेत सर्वच संगणक तज्ज्ञ शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्रशालेला संगणक संच भेट दिल्याबद्दल रोटरी क्लब मुलुंड साऊथ आणि मुकेश केनिया यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, संस्था चालक शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष किशोर नरे आणि सर्व सदस्यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page