⚡मालवण ता.२३-:
गोडकर्स आर्ट अकॅडमी मालवण यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा शाळानिहाय निकाल जाहिर झाला आहे. या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ दि. २ मे रोजी दैवज्ञ भवन हॉल मालवण येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची चित्रे व चित्रकार विनायक गोडकर यांची चित्रे यांचे संयुक्त चित्र प्रदर्शन होणार आहे. हे चित्र प्रदर्शन २ मे ते ५ मे पर्यंत सुरू राहणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:- टोपीवाला हायस्कूल – वासुदेव रामचंद्र पराडकर, आभा उमेश परब, हेतल संदिप शिरोडकर, अर्णव भागवत अवचार, प्रज्ञा राजु मोरजकर, आदित्य मनोज दुधवडकर, संजीवनी संजय परब, जान्हवी समीर नाईक, सानिया दिपक आजगावकर, पवनी चेतन मुणगेकर, महती जितेंद्र मोर्वेकर, ऋतुजा गुरूनाथ शेलटकर, स्वरुपा लक्ष्मण वळंजू, अर्थव अजित पार्ट, पावनी निलकंठ मुणगेकर, फ्रान्सिस पिटर शिवलकर, स्वरा केदार सामंत, अस्मी सुधीर भगत, निरजा नंदकुमार फणसेकर, हर्ष रमाकांत पेडणेकर, समर्थ सचिन बांदकर. धुरीवाडा प्राथमिक शाळा – रुही संतोष साळकर, पालक्षी गणपत आडीवरेकर, काव्या संतोष राउळ, साईजा साईनाथ वाघ, रोझरी इंग्लिश स्कूल मालवण – ऍव्हीडन जेरी फर्नांडीस, सारा प्रविण पवार, स्वयंम विजय वायंगणकर, केतक गणेश मेस्त्री, अथर्व प्रसाद आडवलकर, एलिसन नऱ्होना, सेरीना फर्नांडीस, भंडारी हायस्कूल मालवण – पार्थ साईनाथ मेस्त्री, मिथिल राजू मालवणकर, जान्हवी प्रमोद चव्हाण, अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे – अनंत विलास गवंडे, मेघना संदिप सावंत, अभिनय देविदास देऊलकर, आशिष शंकर परुळेकर, अस्मिता गंगाराम कुंभार, मयुरेश विनोद केरकर. जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण – मिरा अभिजीत परब, रोहित विठ्ठल डिचवलकर, रुद्रा राजेश कादु, यश संजय येरम, आचरा इंग्लिश स्कूल – श्रावणी दयाळ पाटकर, नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कूल आचरा पूजा शिवाजी कुंभार.
खुला गट- दिलीप मयुरेश वायंगणकर (मालवण), सावली प्रकाश वेंगुर्लेकर (कुडाळ, शिवाजीनगर), तन्मय परुषोत्तम नेरुरकर (नेरुर), अपूर्वा नितीन जाधव (शासकीय तंत्र निकेतन, मालवण), रुजूल योगेश सातोसे (पडतेवाडी कुडाळ), नुपूर संदिप सुतार (घोणसरी), जरीम सलिम शेख, ऋगवेदा शिवराज धामापूरकर (सोमवार पेठ मालवण), चंद्रशेखर सुर्यकांत कोचरेकर (मालवण) वर्षा मनोहर गावडे (पिंगुळी, कुडाळ), सुकन्या सुरेश उज्जवले (शासकीय तंत्रनिकेतन), मयुर महेश परब (पाट).
