⚡मालवण ता.२२-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. मालवण बंदर जेटी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे हे उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी ७ वा. शालेय विद्यार्थ्यांची वाळू शिल्प स्पर्धा, ८वा. मान्यवरांचे स्वागत, त्यानंतर बीच रन, सकाळी ८.२५ वा. वाळू शिल्प पाहणी व परीक्षण, ८.४५ वा. मतदारांची प्रतिज्ञा, ८.५० वा. बक्षीस समारंभ होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
