राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांनी सुरू केली कारवाई
*💫सावंतवाडी दि.२५-:* सावंतवाडी शहरात मोती तलावाकाठी धूम स्टाईलने दुचाकी चालवणाऱ्या युवकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक अपघात देखील होत आहेत. याच प्रश्नावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आक्रमक होत त्यानी सावंतवाडी निरीक्षक शशिकांत खोत यांची भेट घेत त्यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधले होते. या युवकांवर कारवाई करण्याची त्यानी यावेळी मागणी केली होती. त्यांनी केलेल्या या मागणीनंतर एस पी के कॉलेज येथे पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली असून विना लायसन धूम स्टाईल दुचाकी चालवणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, याही पुढे अशी कारवाई सुरू ठेवावी असे मत व्यक्त केले आहे. यावेळी वाहतूक पोलिस प्रविण सापळे;सुनील नाईक, एपीआय योगेश जाधव आदी पोलिस कारवाई करत आहेत.
