नेरूर गावामधील शिमगोत्सव यावर्षी केवळ ‘गाव मर्यादित’…

सिंधुदुर्गनगरी ता २५ नेरूर गावचा शिगमोत्सव यावर्षी केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे .तरी भाविकांनी संभाव्य गर्दी टाळून सहकार्य करावे .असे आवाहन श्री गावडोबा देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नेरूर गावचा शिमगोत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय शिमगोत्सवांपैकि एक आहे.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात या शिमगोत्सवात सामिल होण्यासाठी जिल्ह्याच्या व जिल्ह्याबाहेरच्या कानाकोप-यातून लोक नेरूर गावामध्ये दाखल होत असतात. परंतू यावर्षी नेरूर गावच्या या शिमगोत्सवावर ‘कोरोना महामारी’चे सावट आहे. त्यामूळे यावर्षीचा शिमगोत्सव केवळ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत..’कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून’ व ‘कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजना करून’च साजरा केला जाणार आहे. विशेषतः गावडे बांधवांचे सुप्रसिद्ध गोडे रोंबाट व या अनुषंगाने होणारी गर्दी लक्षात घेता..ही गर्दी पूर्णपणे टाळून..केवळ ‘स्थानिक ग्रामस्थां’च्या उपस्थितीत ‘अत्यंत साधेपणाने’ हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे. यावर्षी नेरूर गावा व्यतिरिक्त इतर गावातील लोकांनी आप आपल्या घरीच थांबून..श्री देव गावडोबा-कलेश्वराला सश्रद्धभावनेने नमस्कार करून आपली सेवा श्रींचरणी रूजू करावी व होणारी संभाव्य गर्दी टाळून सहकार्य करावे.. असे आवाहन श्री देव गावडोबा देवस्थान समिती, नेरूर-माड्याचीवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page