*💫बांदा दि.२५-:* गोव्यातून पुण्याकडे होणार्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात धुळे जिल्ह्यातील चालक व क्लिनरवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. चालक विठ्ठल लहानु बोरकर (वय ४१रा.धुळे) व राजू शुरसिंग सोळंकी (वय २४, रा. बडवानी-मध्यप्रदेश) यांना गुरुवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. बांदा पोलिसांनी बुधवारी सकाळी येथील पोलीस तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल ६५ लाख ८२ हजार ९६२ रुपये किमतीच्या दारू साठ्यासाह एकूण ७० लाख ८३ हजार ४६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी चालक विठ्ठल बोरकर व राजू सोळंकी यांना गुरुवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ दोघांना सात दिवस पोलीस कोठडी…
