तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा…

⚡कणकवली ता.२३-: ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळे-धनगरवाडी धनगरबांधवांचे प्रश्‍न व समस्यांवर जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठक घेण्यात आली. यात प्रश्‍न व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.


बैठकीला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष सुरेश जंगले, सखाराम खरात, सीताराम खरात, राजू जंगले, दीपक खरात, सखाराम जंगले, गणेश खरात, सीताराम बाळू खरात, विठ्ठल जंगले, अनिल खरात, आनंद खरात, शामू खरात आदी उपस्थित होते.


धनगरबांधवांना भेडसावत असलेले प्रश्‍न व समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. विजय खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुरेश जंगले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर सुरेश जंगले यांचे सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आभार प्रदर्शन दीपक खरात यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होत

You cannot copy content of this page