⚡कणकवली ता.२३-: श्री इस्वटी गणेश विकास मंडळातर्फे माईण-उभाडेवाडी येथील गणेश मंदिरात सोमवार 29 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी 11 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती, दुपारी 1.30 वा. महाप्रासाद, रात्री 9 वा. श्री महादेश्वर प्रा. भजन मंडळ, नाडण-देवगडचे बुवा संदीप पुजारे, श्री कोटेश्वर नवतरुण भजन मंडळ, हरकुळ बु. चे बुवा अभिषेक शिरसाट, श्री दत्त भवानी प्रा. भजन मंडळ, बावशीचे बुवा उद्धव कांडर यांच्यात डलबबारी भजनाचा सामना होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
