महायुतीच्या प्रचाराचा सायंकाळी चार वाजता शुभारंभ…

महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे; संजू परब यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरात आज महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सायंकाळी चार वाजता होणार असून यावेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी [आठवले गट] यांच्या सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सर्व पक्षाच्या महिला मोर्चा, युवा मोर्चा च्या सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजता सारस्वत बँकेच्या शेजारी महायुतीच्या कार्यालयात जमावयाचे आहे.असे आवहान माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर व माजी आमदार राजनजी तेली यांच्या उपस्थितीत चराठा येथील श्री देवी सातेरी, श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर यांना श्रीफळ अर्पण ठेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करावयाचा आहे.

तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज दुपारी चार दवाजता महायुतीच्या कार्यालयाकडे जमावयाचे असे आवाहन शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, महेश सारंग, बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, मनोज नाईक, सुरेश गवस, अशोक पवार, आशिष कदम आदींनी केले आहे,

You cannot copy content of this page