निलम राणें: महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद..
वेंगुर्ला प्रतिनिधी-गेली ३४ वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात विविध माध्यमातून विकासात्मक कामे करत आहेत. यावेळी महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे साहेबांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन निलमताई राणे यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुक प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी वेंगुर्ला तालुक्यात निलमताई राणे यांनी झंझावती दौरा केला. चार ठिकाणी महायुती महिला मेळाव्यात उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. वेंगुर्ला शहर, आडेली व उभादांडा जिल्हापरिषद मतदार संघाचा मेळावा स्वामिनी मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्याला महिलांची मोठी उपस्थिती होती. महिलांनी राणे यांच्या पाठीशी असेच उभे राहून त्यांना या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन निलम राणे यांनी केले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती अस्मिता बांदेकर, भाजप महिला प्रदेश सदस्य संध्या तेरसे, माजी जि.प अध्यक्षा सुमेधा पाताडे, अॅड. सूषमा प्रभूखानोलकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, भाजपा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी सभापती वंदना किनळेकर, सारीका काळसेकर, बाजार समिती सदस्य सुजाता देसाई, गौरवी मडवळ, प्राजक्ता चिपकर, श्वेता चव्हाण, प्रणाली बंगे, सीमा सावंत, दिपा दाभोलकर, स्मिता दामले, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, हेमा गावस्कर, पुनम जाधव, रूपाली नाईक, प्राची नाईक, शमिका बांदेकर, वैभवी मालवणकर यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते.
परुळेबाजार येथील महायुती महिला मेळाव्यात नारायण राणे यांना मतदान करून खासदारकीच्या माध्यमातून सेवा करण्याची पुन्हा एक संधी द्या असे आवाहन निलम राणे यांनी केले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे, गुरुनाथ मडवळ यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
रेडी जिल्हा परिषद मतदार संघाचा मेळावा रेडकर हॉस्पिटल सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यात रेडी येथील उबाठा सेना पदाधिकारी नमिता बागायतदार यांनी सहका-यांसमवेत निलम राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी या मतदारसंघातून नारायण राणे यांना मतदान करणे का गरजेचे आहे याची माहिती दिली. तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक नीता कविटकर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी धडाडीचे नेतृत्व नारायणराव राणे यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना महिला तालुका संघटक प्राची नाईक, उपजिल्हा प्रमुख उत्कर्षा गावकर, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, प्राची कुबल, उपजिल्हा संघटक आसावरी, रश्मी पेडणेकर, आरवली सरपंच समिर कांबळी, रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान महायुतीचा शेवटचा मेळावा तुळस जि.प. मतदार संघात उत्सव मंगल कार्यालयात झाला. या मेळाव्यालाही महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
फोटोओळी – वेंगुर्ला येथील महिला मेळाव्यात निलम राणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
