महायुतीच्या होल्डिंगवरून राज ठाकरेंची “छबी” गायब…

सावंतवाडीतील प्रकार: मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी

⚡सावंतवाडी ता.२२-: महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशरथ पाठिंबा दिला असताना मात्र सावंतवाडीत लावण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाकडील होल्डिंग वर राज ठाकरे यांचा फोटो नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे आमचे नेते आहे त्यांचा शब्द पाळून आम्ही काम करणार मात्र आमच्या नेत्याचा फोटो बॅनरवर का नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान ही नाराजी दुर करण्यासाठी महायुती काय पाऊले उचलतात हे पाहणे गरजेचे आहे

You cannot copy content of this page