नमोकार महामंत्र जगातील सर्वाधिक मंगलमय महामंत्र…

डॉ-शैलेंद्र ढणाल:बोर्डवे येथे भ.महावीर जन्मकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡देवगड ता.२२-: भगवान महावीरांचे सत्य शांती अहिंसा हे शिकवण जगाला निश्चितपणे पटलेली असून नमोकार महामंत्र हा सर्वाधिक जगातील मंगलमय मंत्र आहे आणि त्याचे महत्त्व देखील जगातील सर्व नागरिकांना पटलेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .भगवान महावीरांची शिकवण व जैन धर्माचे आचरण करणे ही काळाची गरज असून महात्मा गांधींचे गुरु हे देखील जैन होते त्याचमुळे महात्मा गांधींनी सत्य शांती अहिंसेचे धोरण अवलंबले व त्यांनी सत्कार्य केले झाडात देखील जीव असतो पाण्याच्या थेंबा देखील जीव असतो हे तत्वज्ञान भगवान महावीर यांनी त्या काळात जगासमोर आणले होते. आजच्या ग्लोबल वारमिंगच्या दुनियेत त्याचे महत्त्व संपूर्ण जगाला पटलेले आहे. मानव एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो हे देखील तत्त्वज्ञान भगवान महावीर यांनी त्याकाळी सांगितले. भगवान महावीरांची शिकवण ही प्रत्येकाने अंगीकारणे महत्वाचे आहे. जेणेकरून आज संपूर्ण जगाला सत्य शांती अहिंसा धोरण महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन डॉक्टर शैलेंद्र ढणाल यांनी बोर्डवे येथील सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार आयोजित २४ वे स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव सोहळ्यात बोलताना केले.


याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे अध्यक्ष डॉ. दीपक तुपकर सरचिटणीस दिपराज बिजितकर,महिला मंडळाचे अध्यक्ष सौ दीपिका बीजीतकर सौ. ढणाल, दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मागले जैन शैतवाल संघाचे अध्यक्ष रवींद्र नवाळे, जैन परिवारचे जेष्ठ सल्लागार बाळासाहेब डोर्ले, रवींद्र पोकळे,राजाराम दंताळ, महावीर मांगले, उपस्थित होते .
प्रारंभी मंदिरात अभिषेक पूजा व भगवान महावीर जन्म कल्याण सोहळा पार पडल्यानंतर आयोजित केलेल्या समारंभाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. दीपक तुपकर यांनी करून सिंधुदुर्ग जिल्हा वाटचालीचा आढावा घेतला. उपस्थित पाहुण्यांचे परिचय डॉ संगीता तुपकर यांनी करून दिला
या निमित्ताने जैन समाजाला विशेष सहकार्य करणारे यशस्वी उद्योजक व देणगीदार तसेच जैन परिवाराचे पदाधिकारी यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यापुढे बोलताना श्री ढणाल म्हणाले, जैन समाज औद्योगिक औद्योगिक क्षेत्राबरोबर, अन्य सर्व क्षेत्रात जैन समाजातील व्यक्ती या आघाडीवर असून अल्पसंख्याक ०.०४ लोकसंख्या असलेला जैन समाजाचा आर्थिक क्षेत्रातील वाटा हा सर्वाधिक आहे. देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचे योगदान सर्वात मोठे असून अनेक शास्त्रज्ञ, उद्योगपती हे देखील जैन धर्मीय आहेत. भगवान महावीर देखील हे एक प्रकारचे शास्त्रज्ञ होते त्यांनी त्या त्यावेळी सांगितलेल्या सिद्धांतानुसार त्याची प्रचिती आजच्या काळात येत असून भगवान महावीरांचे आचरण आजच्या पिढीने करत असताना कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आजच्या मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी .बँकिंग इंजिनियर वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून मुलांना आवडीचे शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा विशिष्ट क्षेत्र लादु नये असे त्यांनी आवर्जून नमूद केले याच अनुषंगाने आजच्या युगातील जंक फूड तसेच कोल्ड्रिंक हे लहान मुलांना अतिशय हानिकारक असून कोल्ड्रिंक हा डीहायडेशनचा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना दिगंबर जैन कासार समाज कोकण विभागीय अध्यक्ष दयानंद मांगले यांनी आपल्या मार्गदर्शनात सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे गेल्या २४ वर्षातील कार्य हे निश्चितपणे समाजाला कौतुकास्पद असून जैन समाजाचे संघटन करण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे .अशाच पद्धतीने जैन समाजातील विविध जाती-पोट जाती यांचे संघटन करण्याचे काम विविध संस्था करत असून जाती पोटजाती या वेगवेगळ्या असल्या तरी आपण जैन आहोत हे प्रत्येकाने अभिमानाने सांगणे .गरजेचे आहे. दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी संपूर्णपणे कोकणापासून विदर्भ मराठवाड्यापर्यंत संघटना बांधणीचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असून दिगंबर जैन कासार समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी समाजातील गरजू गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, वस्तुरुपी मदत तसेच विविध संस्थांना आर्थिक मदत दिलेले आहेत. आणि यात सर्वाधिक मोठे योगदान पुणे येथील दानशूर दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे उपाध्यक्ष विजय (अण्णा) कासार यांचे असल्याचे आवर्जून नमूद केले.
समाजातील प्रत्येक घटकांनी या पुढील काळात देखील आपण जैन आहोत. असा अभिमान बाळगून सर्व समाजाचे संघटन करण्याकरता एकत्रित पणे विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले . यानंतर भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येऊन पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांचे हस्ते पार पडला. यात प्रामुख्याने जैन व अज्जैन लोकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला
यात लहान गट प्रथम रिया प्रशांत वराडकर ,उभादांडा, द्वितीय विभागून ऋचा आदिनाथ शिरगावे जयसिंगपूर ,नव्या हेमंत कल्याणी ठाणे ,तृतीय क्रमांक विभागून श्रेया सहिल,डोर्ले, फोंडाघाट आर्य संदेश मोचेमाडकर, उभादांडा, उत्तेजनार्थ आर्या लक्ष्मण बोगार माणगाव
मोठा गट -प्रथम क्रमांक सलोनी अशोक कदम, हिवाळे मालवण द्वितीय क्रमांक विभागून श्रीमती अर्चना शरद भोकरे मिरज दीपिका दीपराज बिजीतकर ,वेंगुर्ला,तृतीय क्रमांक विनिता प्रशांत पांजरी मालवण गौरव गोपाळ नाईक फोंडा गोवा यांना या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते मार्ग पडले.
सूत्रसंचालन सौ नवाळे आभार दिपराज बीजितकर यांनी मानले.
: १)भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यात मार्गदर्शन करताना मान्यवर
२)निबंध स्पर्धेतील विजेत्या गौरविताना मान्यवर

You cannot copy content of this page