*💫बांदा दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मानसिक आरोग्य तपासणी व ताणतणाव नियोजन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी पं. स. सभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, रुग्ण कल्याण समिती सदस्य उदय देऊलकर, वसंत जाधव, क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप, दंत शल्य चिकित्सक डॉ. कांचन देसाई, सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या अंकतवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप यांनी ताणतणावांचे स्वरूप व मानसिक आरोग्य तपासणी याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांची मानसिक आरोग्य तपासणी करुन उपचार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन, आरोग्य सहाय्यक व्ही. के. आंबेरकर, टी. ई. चव्हाण, के. के. भाईप, के. के. नाईक, एस. एस. वेटे, जे. एस. म्हापणकर, एस. एस. बांदवलकर, आर. एस. गवस, बी. आर. मेस्त्री, गटप्रवर्तक व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ. जगदीश पाटील तर आभार व्ही. के. आंबेरकर यांनी मानले.
बांद्यात मानसिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न….
