विनायक राऊत: राणेंना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या…
⚡आंबोली,ता.२०-: दोडामार्ग,गोंदिया,भंडारा,छत्तीसगड येथे खनिज प्रकल्पासाठी इथल्या जमिनी पर्यायी जागा म्हणून वनखात्याला देण्यासाठी ४२ हजार हेक्टर जमिनीवर वन संज्ञा लावली,आंबोली,चौकुळ,गेळे इथल्या स्थानिकांच्या कबुलयातदार जमिनी सरकारी करून टाकल्या आणि इथल्या वडिलोपार्जित जमिनी एका रात्रीत काढून घेतल्या. त्या नारायण राणे यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या त्यांना धडा शिकवण्याची संधी पुन्हा लोकांना मिळाली आहे असे प्रतिपादन इंडिया आघाडीचे खासदारकीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत यांनी चौकुळ येथे केले.
आंबोली चौकुळ भागात आज खासदार विनायक राऊत यांनी प्रचाराची सुरुवात करताना चौकुळ येथे सातेरी देवीचे दर्शन घेतले.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांच्या घरी बैठक झाली. यावेळी दिनेश गावडे यांनी आपण हुकूमशाही विरोधात निवडणुकीसाठी शिवसेनेला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्याठिकाणी माजी आमदार प्रवीण भोसले,अर्चना घारे परब,बाळा गावडे, बाबा म्हापसेकर,रुपेश राऊळ,चंद्रकांत कासार,बाळू माळकर,आबा सावंत तसेच चौकुळ चे अरुण गावडे, रुपेश गावडे, तुकाराम गावडे, प्रकाश गावडे, माजी सैनिक अरुण गावडे, तुकाराम गावडे, सावळाराम गावडे, भाऊ जाधव,परशुराम गावडे,आंबोली विभागीय अध्यक्ष बबन गावडे,संतोष पाताडे,बाळा कोरगावकर,लक्ष्मण पटकारे,प्रवीण खरुडे,काशीराम राऊत,सुनील राऊत,मोहन गावडे, विठ्ठल गावडे, दादा नाटलेकर,लक्ष्मण गावडे, नाटलेकर,दुलाजी गावडे ,डुबा राऊत,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले,”माझ्या प्रचार पत्रकावर जो फोटो आहे तो लांजा मधील डोंगरावरचा माचाळ गावातील आहे.त्याठिकाणी प्रथमच मीपोचल्यानंतर तेथे २२ कोटी खर्च करून रस्ता करून दिला. त्याठिकाणी कोण आमदार खासदार पोचले नहोते मला तिथल्या लोकांनी घर बांधायला जागा देत होते आज त्या ठिकाणी पर्यटन चालते मात्र जमिनी प्रॉपर्टी वाढवणारा मी खासदार नव्हे,विरोधी खासदारांची प्रॉपर्टी बघा.मी माझ्या वडिलोपार्जित जागेतच आहे. राजकारणात राहून अमाप संपत्ती कमावणारे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत.” यानंतर आंबोली माऊली मंदिर येथे माऊली देवीला श्रीफळ खासदार विनायक राऊत यांनी गावकऱ्यांच्या हस्ते ठेवले. त्यांनतर प्रकाश गुरव येथेही नारळ ठेवण्यात आल्यानंतर खळा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रवीण भोसले यांनी भाषण केले,यावेळी खासदार राउत म्हणाले, दीपक केसरकर कायम माझी तक्रार उद्धव साहेबाकडे करायचे पण मी त्यांच्या उदी ला घाबरत नाही.वेत्ये गाव हायवेला 25 एकर जागा देत होते पण केसरकर यांनी माझ्या अधिकारावर गदा आणताय म्हणून विरोध करून मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल ला खोडा घालण्याचे काम केले. कबुलयातदार जमीन प्रश्न केसरकर आणि तेली च्या श्रेयवादामुळे प्रश्न रखडला.चोरांनी धनुष्यबाण चोरला मात्र माउलीने मशाल हाती दिली आहे.ज्यांनी घरदारावर वडिलोपार्जित जमिनीवर नांगर फिरवला त्यांना हद्दपार मतदानातून करा. माझ्या वचन नाम्यामध्ये इथला कबुलयातदार,आकारीपड,वनसंज्ञा हा प्रश्न घेतला आहे तो मी सोडवणारच आणि जे काय करायचं ते काम आगामी काळात करणारच.”” इथल्या आंबोली चौकुळ गावातील लोकांनी १०० टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठी ठाम राहा असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.यावेळी प्रकाश गुरव, राजा सावंत,सरस्वती परब,सौ गुरव,मनोहर गावडे,संजय राऊत,गुरव घरातील सर्व,नाना जाधव,बबन गावडे, अजित नार्वेकर,निखिल गुरव,बाबी गुरव,झिला गावडे,शशी सावंत,भाऊ चव्हाण आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
