वैभववाडी प्रतिनिधी
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती जयदीप जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची सर्वसाधारण सभा देवगड येथील टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली. सुरुवातीला देवगड तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. या निवडीमध्ये सौ.ज्योती जयदीप जाधव यांची देवगड तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सौ. ज्योती जाधव यांना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष योगेश मस्के, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, कणकवली तालुका संघटक तथा स्पेक्टोमार्कचे संचालक मंगेश चव्हाण, तसेच देवगड तालुका संघटक श्रीकृष्ण दुधवडकर, सदस्य सौ.दिपाली आयरे, मालवण तालुका सदस्य श्री.आचरेकर, सुरेखा जोशी, सौ.गुरव तसेच देवगड तालुक्यातील संघटनेचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संघटनेच्या वतीने नुतन तालुका अध्यक्षा सौ.ज्योती जाधव तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर संघटनेचे कार्य प्रत्येका पर्यंत पोहचवून संघटना वाढीसाठी व संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केले.
फोटो ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या देवगड तालुका अध्यक्षपदी सौ.ज्योती जयदीप जाधव यांची निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देतांना संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, योगेश मस्के, संतोष नाईक, मंदार काणे, सुधीर धुरी व इतर
