*मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मांडल्या समस्या; समस्या दूर करण्याचे मुख्याधिकारी यांचे आश्वासन*
*💫सावंतवाडी दि.२५-:* शहरात काही भागात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी शहरात काही भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावेळी मुख्याधिकारी यांनी योग्य प्रकारे पाणी पुरवठा व स्वच्छ पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात शहरात पाणी प्रश्न उद्भवू नये यासाठी नवीन टँकर येत्या काही दिवसात उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
