विरोधकांनी सावंतवाडी नगरपालिका सत्तेचे फक्त स्वप्न पाहावे…

संजू परब : आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकणार

*💫सावंतवाडी दि.२५-:* विरोधकांनी आता कोणत्याही मुद्यावरून शहरात राजकारण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा विश्वास सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे त्यांनी आता ही स्टंटबाजी बंद करावी असा टोला विरोधकांना लगावला आहे. शहरात भाजपने विकास कामांचा धडाका सुरू असल्याने पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असून, येथील जनता भाजपच्या पाठीशी उभी राहणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page