*नगराध्यक्ष संजू परब यांची टीका*
सावंतवाडी-: हातात असलेली सत्ता गेल्यामुळेच सावंतवाडीचे माजी नगरसेवक हतबल झालेअसून नको तो पाणी विषय घेऊन नगरपालिकेत येत आहेत. गेली अनेक वर्ष सत्तेत असताना हा पाणी प्रश्न का सोडवला नाही असा सवाल नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच आमच्याकडे अजूनही पाणी प्रश्नावरून एकही तक्रार आली नसून, कुठे कमतरता पडत असल्यास तेथे आपण दुरुस्त करत आहोत. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करू नये असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी आरोग्य सभापती सुधिर आडीवरेकर,नगरसेवक उदय नाईक,आदी उपस्थित होते.
