अंजली पराडकर व सहकारी स्वगृही परतले..
⚡मालवण ता.१८-: काही महिन्यांपूर्वी भाजप पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या मालवण येथील महिला सामाजिक कार्यकर्त्यां अंजली लीलाधर पराडकर यांच्यासह अनेक सहकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे मालवण दौऱ्यावर असताना या सर्वांचे स्वागत ना राणे यांनी केले
यावेळी प्रवेशकर्त्या अंजली लीलाधर पराडकर यांसह योगिता मोंडकर, सविता मोंडकर, जानव्ही शिर्सेकर, मारिया फर्नांडिस, आकांक्षा पराडकर, प्रतीक्षा मोंडकर, कांचन धुरी, हर्षा लोणे, अनुष्का पराडकर, शकुंतला निवतकर, सुनीता गांवकर, सिल्वाया पराडकर, मंदा मोंडकर, नरेश कोयंडे, संतोष पराडकर, बबलु मोंडकर, मंगेश कोयंडे, स्वप्नील बटाव, आनंद करवंदेकर, संघर्ष जांभरकर, जितु शिर्सेकर, इशेद डिसोजा, निलेश मोंडकर, राजेश हुले, दिनेश परब, आतोन पेडणेकर, हिमांशू परब, अतोन फर्नांडिस, राजन परब, अमित खरात, लुईस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांनी यापुढे भाजप पक्षप्रवेश होतच राहणार असे सांगितले. यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे व इतर उपस्थित होते
